Tuesday, 18 February 2014

अन माझी मी, ओळख हरवून आली..!!

रस्ता चालताना,बरीच दूर निघून आली..!! 
अन माझी मी, ओळख हरवून आली..!!

दर्द भरी कहाणी, आज ऐकवणार नाही,
शेवट त्या व्यथेचा, मी करून आली..!!

तुटलेल्या क्षणानाही, एक खंत वाटावी, 
ती सवय, आठवणी जपायची तोडून आली..!!

जगण्याचे म्हणे, उत्तरे सापडत नाही,
म्हणून हरेक प्रश्नच मी, संपवून आली..!!

काय झाले..?? काय बघता डोळे विस्फारुनी..??
का मी तुमच्या अपेक्षांच्या पुढे निघून आली..??

रडत,कोसळत,ओरडत असंच जगावं का मी..??
दुख: हृदय तुटण्याचे, मी पेलवून आली..!! 

अग्निपरीक्षेत स्वत:च्या यशस्वी होऊन,
अस्तित्वात मी आज नव्याने आली..!!


Thursday, 13 February 2014

प्रेमा रे



वेगळे दोघांचे राहणे अशक्य अता 
नको देऊ हा- विरह प्रेमा रे..!!

ना दिसावी चाहूलही भेटायची 
इतका तू का- निष्ठुर प्रेमा रे..!!

आघात-अपघात फार दिलेत
तरीही तुझा का- मोह प्रेमा रे..!!

येण्याची अन जाण्याची लगेच
सांग तुला का- घाई प्रेमा रे..!!

निरपेक्ष कुणावर प्रीत करावी 
हाच काय माझा- दोष प्रेमा रे.!!


Wednesday, 5 February 2014

अपराध

"अपराध"

मस्करीत नको ते शब्द बोलले गेले;
आणि टचकन डोळ्यात तुझ्या पाणी आले..!!

घात करायचा नव्हताच, पण नको ते घडले;
आणि अपघाताचे या घावही भलतेच खोल झाले..!!

असह्य तुझ्या डोळ्यातील तिरस्काराने केले;
आणि तू नजरेतून सहज सर्व टाळले..!!

शब्दांच्या वेदनांना बऱ्याचदा मी उपाय शोधले;
शेवटी खंत उराशी कवटाळून हे जगणे स्वीकारले..!!

पण मी खरच मुद्दाम नाही काहीच केले;
"अपराध" जे तुला वाटतात, ते नकळत घडले..!!

Tuesday, 21 January 2014

निखारे

सुरवात कशी करू आणि संपवू कुठे..!!
बाका प्रसंग उद्भवला अता जाऊ कुठे..??

कळत नाही, कळतय काही, असही नाही,
फक्त नकळत कळतच सार, सांगू कुठे..??

जगण्याची दिशा हरवली नव्हतीच मुळी
पण ओळखीचाच हा रस्ता नेतोय कुठे..??

रक्तबंबाळ भावनेचा कागद दुर फेकला खरा
पण शब्दांच्या जखमेचे ओरखडे लपवू कुठे..??

खंत तरळलेल्या आसवांची नव्हतीच कधी
पण कळे ना उसने हे अवसान हसण्याचे कमाविले कुठे..!!

जुने चटके रंगवून सांगण्यात कसली मजा..??
नवीन “निखारे” शोधण्यासाठी अता जाऊ कुठे..??  

(२१/०१/२०१४, यवतमाळ)



Thursday, 9 January 2014

"तो" म्हणजे

लोकांची तक्रार असते नेहमी, 
कवितेत का “तो” असतो नेहमी..??
मलाही नकोच असतो कवितेतला “तो”
पण शब्द तिथेच सापडतात नेहमी..!!


लोक म्हणाले, “कंटाळलोत आम्ही,
त्याच्या विषयीच तू बोलतेस नेहमी..!!”
“तोच” नाही का माझी अलिखित गझल
जी लिहायचा फक्त प्रयत्न करते मी..!!


धमकी देत म्हणाले, “शेवटचे बजावतोय,
“तो” दिसला जरी पुढे वाचणारच नाही आम्ही..!!”
तुमची पर्वा केलीच कधी श्रोतेहो 
“तोच” पुज्य, मला आणि कवितेलाही नेहमी..!!


पुढे म्हणाले, “विसरलीस वाटतेस,
आम्हीच  तुझ्या शायरी ची वाहवा केलीय नेहमी..??”
माझी प्रत्येक शायरी सुंदर सजली
फक्त त्याच्याच साठी नेहमी...!! 


शेवटी वैतागून म्हणाले, “का त्याच्या नावाने,
लपतेस दुख: अंतरातले नेहमी.??”
“तो” म्हणजे फक्त दुख: आणि वेदना
हेच विसरलात वाटातय तुम्ही..!!

Friday, 3 January 2014

रात्री नंतर प्रकाशाचा सूर्य आहे सांडला


तू अधीर, मी अधीर, चंद्रही अधीरला
सूर्याने सांजवेळी खेळ आंधळा मांडला

दु:ख आपले थैमान मांडून अंतरी बैसला
शांततेने या जीव फार उदासला

समुद्राच्या गाभाऱ्यात सूर्य पहा बुडाला
गावाबाहेरील देवळात अन मी दिवा लावला

निशेच्या एकांतात छळतो तुझा अबोला
कितीदा सांग गुंफू आसवांची शृंखला?

गुलाबी थंडीत मी जपते जुलमी दुरावा
प्रतीक्षा तुझी संपेल नक्की हीच आस जीवाला

संपणार कधी ही व्यथेची मालिका..?
हे सख्या सांग ना रे हे आता तू मला..!

फिरून फिरून जन्म जरी दु:खाने घेतला
रात्री नंतर प्रकाशाचा सूर्य आहे सांडला..!!

Monday, 16 December 2013

हास्य आणि हुंदके

दिसतात कुलूप लावूनी अधिक देखणे ते प्रसंग या  मनातले,
किती विस्तारात आठवते अजूनही मज जीवन त्या क्षणातले.

जसाच दृष्टीतल्या त्या नजरेचा भाग सैल झाला होता,
अधिक सुंदर दिसत गेले ते दृश्य माझ्या डोळ्यातले. 

न ते मोठे शब्द , न त्यांच्या अर्थाचा काही पत्ता होता,
वाऱ्यातही ती बाब कुठे , असे ते प्रेम या वयातले. 

कधी याचे मन तर कधी त्याचे मन होते, 
वाढतीस राहिले नेहमी हे हृदय माझ्या उरातले.

न चुकले माझे काही, न बरोबर त्यांचे काही होते,
हिशोबात या वाया गेले , न जाणे किती ठोके या जगण्यातले. 

खांद्यावर हाथ ठेवुनी त्यांच्या रस्ता चुकला होता, 
राहतात दूरच शोभूनी सगळे ते सल्ले माझ्या नात्यातले.

हाती धनुष्य असूनही, विचारांना मेनकेचा नाद होता,
ओढुनी न्यायचे मला नेहमी , ते जोर या मोहातले.


सौजन्य:
वैभव गुणवंत भोयर
(vgb3333@gmail.com)