कविता एक दुवा असतो.एका मनाचा दुसऱ्या मनाशी.समजला तर गवसला नाही तर हरवला.. लिहावे जे सुचते ते,नवीन अनुभव जोडले जातात त्यांनी.!!
Saturday, 30 June 2012
उंबरठा
खूप आवेगाने,
बेभान होऊन..
तुझ्याजवळ येण्यासाठी निघाली होती..
पण "सख्या रे.."
आडवा आला "उंबरठा घराचा" उंबरठ्या जवळ येताना,
आपसूकच बांधली गेली,
वर्षानुवर्षाच्या संस्कार आणि नात्यांनी..
माझा आवेग तिथेच
गोरामोरा होऊन तुटून पडला..
No comments:
Post a Comment