Sunday 27 January 2013

आजकाल बरच काय काय...!!!

आजकाल काय...??
आजकाल काय..??

आजकाल बरच काय काय...!!!

व्यर्थाची  बडबड काय..!!
नुसतच पायपीट काय..!!

रात्रभर जागन काय..!!
नुसताच खिडकीतून चंद्र न्याहाळण काय..!!

कधीही हृदयाची धडधड काय..!!
स्वत:च्याच श्वासात अडकण काय..!!

कारण नसताना चिडण काय..!!
तासनतास आरशात पाहन काय..!!

आजकाल काय...??
आजकाल काय..??

आजकाल बरच काय काय...!!!


Monday 14 January 2013

खिडकी जवळ कोसळलेलं रानीच मन...!!!(भाग २)


रानीच मन..!!
भीती नी दाटलाय..
उंबरठा ओलांडायचं धाडस जे केलंय...!!
"वाटते ते" बोलण्यात नाही कुठलच पाप..!!
तरीही चाललाय प्रचंड थरकाप..!!

रानीच मन..!!
भिक मागतय वेळेची..!
स्वत:साठी थोड्या सावलीची..!!
"काहीच चुकलं नाही" या शब्दाची..!!
"आजही सर्व तसच आहे" या विश्वासाची..!!

रानीच मन..!!
चुकल कुठे माहित्ये..??
नाहीच चुकल मुळात-
फक्त नाविन्याचा वेळ समजायला वेळ घेतंय..!!

रानीच मन..!!
आताशी जरा जरा सावारतय..!!
चढलेली मळभ आणि "नकार" पचवतय..!!
खिडकी जवळ दाटलेलं तिचं मन 
शब्द होऊन आवेगाने कोसळून पडतंय..!!

रानीच मन..!!
वाढत असलेली हवेतील उब 
काहीतरी आठवल्यासारखी ओठांवर हसू आणतय..!!
मोकळ्या आकाशाच्या मिठीत शिरून शांत होतंय..!!
खिडकी बंद करून;
प्रेमाच्या आठवणी इथेच थांबवतंय..!!

रानीच मन..!

खिडकी जवळ आज दाटलेलं रानीच मन..!(भाग १)


चार-पाच दिवसांपासून मनाची आणि रूमची पण दारे-खिडकी बंद करून बसली होती राणी..!! तीच मन स्वत:च्याच विरोधात बंड करून उठल होतं..!! पण किती दिवस मनावर आणि शरीरावरही असा निराशेचा मळभ ठेवणार म्हणून आज जरा थंडीतच तिनी दिवसाची सुरवात केली..!! सर्व निराशा झटकून आज नवीन उमेदीन काही तरी करायचं अस रानीच मन तिला बजावत होत..!! इतके दिवस रूममध्ये केलेला अंधार; खिडकीचा पडदा दूर करून तिनी सूर्याची काही किरणे आत येऊ दिली आणि थंड हवेत स्वत:ला जरा विसरली..!! 
रानीच मन..!! हाच विषय आज तिला हाताळावासा वाटला..!! किती तरी गोष्टी चार भिंतीत दाबून गेल्यात, त्यानाही जरा मोकळा श्नास घेऊ द्यावासा वाटला..!! सुरवात राणीच्या सध्याच्या मनातूनच करावी...!!


रानीच मन..!!
सध्या प्रेमात आहे...!!
कुणाच्या..?? 
तर एका नारळाच्या..!!
बाहेरून फार कठोर,निर्दयी वाटणाऱ्या..!!
आणि आतून तितकाच तिला  न समजलेला..!!


रानीच मन..!!


आणि का फार विचार करतय पण ..!!
उत्तर देतानाही तिच्या हृदयाची धडधड जाणवते.!!
विचार करतानाही तिची अस्वस्थता दिसते..!!


रानीच मन..!!
ती चुकली आहे का कदाचित,
नाही पण मनाची कावाडे खोलण्यात चूक काय..??


रानीच मन..!!
घाबरलं आहे जरा  प्रतिसादाने..!!
वात पहातंय त्या कमळाच्या चार शब्दांची..!!!


रानीच मन..!!

Saturday 12 January 2013

शक्य नाही..!!



आता चालणेही  मला शक्य नाही,

वस्तीत या थांबणेही शक्य नाही..!!


झाकले भाव मनीचे सारे,

जखमांना परंतू झाकणे शक्य नाही..!!


हव्याहव्याशा असल्या सर्व आठवणी,

तरी स्मृतीं सोबत जगणे शक्य नाही..!!


स्वप्नात जरी रमले  फार,

कळले आहे सत्यात तसे शक्य नाही..!!


"नाही" "नाही" तच  जगणे  बांधले,

पण  "नाही" त आता थांबणे शक्य नाही..!! 

फक्त बोलायचं


बोलायचं जे वाटते ते,त्यानी मन हलक होतं आणि माणसं जवळ येतात. आपल्याला वाटणाऱ्या भावना शब्दात जमवाजमव करून,बोलायचं..!सुरवातीला जमणार नाही, ह्रदयाची धडधड वाढेल, काही वेळेला डोळ्यातून पाणीही येईल, येऊ द्यायचं कारण आपल्या भावनांवर ताबा ठेवून त्यांना बोलकं करायचा आपला प्रयत्न सफल व्हायचे ते लक्षण असतात..

एकदा जे वाटते ते बोललात की बघा कसं हलकं वाटेल मोरपिसासारखं हलक..!! आपले विचार आणि आपण ही जरा जरा उडायला लागू..!!आणखी नवीन भावना, नवीन संवेदना, नवीन वेदना आपल्या मध्ये निर्माण व्हायला लागेल.. नावीन्याचा अनुभव येईल.. आयुष्यात बदल जानवेल,उत्साह ओथंबून वहायला लागेल..!! हा अनुभव चांगला असेल,खुप चांगला..!! फक्त बोलायला शिका.!! मी शिकली एवढ्यातच,एकदा तुम्ही प्रयत्न करुन बघा..!!

आणि जेव्हा फक्त बोलायचं असते तेव्हा समोरच्याचा RESPONSE खरच कधीच MATTER करत नाही..!!

Wednesday 2 January 2013

तेच फक्त मला विचारायचं होतं..!!

सर्व  काही निरर्थक 
असं किती बोलतेस..!!
अर्थाच काय ते 
डोक्यात मात्र लपवते..!!

माझंही तसच 
हरवल्यासारख वागतो..!!
तुझ्याकडे मलाही 
बोलायची संधी मागतो..!!

बोलताना इथे 
शब्द कापलेले दिसतील..!! 
आणि अर्थही त्यांचे 
निराळेच भासतील..!! 

बोलण्याचे हे फक्त 
राहू नये भास..!!
म्हणून हा माझा 
प्रयत्न आहे खास..!!

विचारायचं धैर्य
विचारातच जमवतोय..!! 
कसं विचारू तूला..??
स्वत:लाच विचारतोय..!! 

विचारल्या नंतर तुझा होकार 
हे मात्र नक्की..!!
हि माझ्या मनाची 
खुनगाठ पक्की..!!

जे तुझ्या-माझ्या मनात 
नेहमीच होतं..!!
तेच फक्त मला 
विचारायचं होतं..!!