ज्या क्षणी
हा हात धरलास
तेव्हाच
मी सर्वस्वाने तुझी झाली..!!
ज्या क्षणी
पहिली ती नजरभेट झाली;
अगदी तेव्हाच
स्वप्नांवर राज्य केलस
प्रत्येक क्षणासाठी...!!
ज्या क्षणी
पहिल्यांदा नाव घेतलस
त्याच क्षणी
नावामागच अस्तित्व तुला दिलं..!!
ज्या क्षणी
मनाच मिलन झालं,
खरच मनाला फार जपलं
अगदी-
माझीच त्याला दृष्ट
लागण्यापासून सुध्दा ..!!
त्या क्षणाची
शपथ मला-
आज पहिल्यांदा
फ़क़्त तेवढी चुकली..!!
माफ कर..!!
पुन्हा असं कधीच नाही..!!