Friday 25 April 2014

मला आत्ता समजत आहे..!!

तेव्हा चुकला नव्हतास तू,
मला आत्ता समजत आहे..!!

“माफ कर”, म्हणून मला
तू आत्ता लाजवतो आहे..!!

कसुरवार दोघेही नाहीत, कारण
एकमेकांचे लहानपण आपण जपतो आहे..!!

निरागसता दोघांची आता समजली,
मुद्दाम काही अंतरे आपण ठेवतो आहे..!!

स्वार्थी नव्हतास रे तू, फक्त
तुला कधी एकटे राहण्याची सवय आहे..!!

तू, विचारातही दुखवू शकत नाहीस मला,
ही तर शांतता खुपणारी, वेदना आहे..!

कुठल्याही वर्षाचा हिशोब, नकोच ठेवूयात,
वेळेत बांधावे इतके परके, का आपण आहे..??

गैरसमज मी जास्त बाळगत नाही,
शेवटी तूच माझा खास दोस्त आहे..!!

Monday 21 April 2014

माघार स्विकारणारी, मी नक्कीच नाही..!!

जीव ओवाळण्याचा मूर्खपणा एकदा झाला,
त्याच त्या चुकांची पुन:वृत्ती नाही..!!


इथे तर घट्ट धरलेले हातही दुरावतात

दु:खात त्या  मुळात बुडणारच नाही..!!


द्यावे नियतीने तिला हवे तशे घाव,

वेदनांची या कधीच तक्रार नाही..!!


आयुष्याने नेहमीच विरोधाभास दिलेत,

त्यांच्या जाळ्यात पुन: अडकणार नाही..!!


आव्हानांना या हसू नकोस, जीवना..!!

तुझ्यासमोर आता झुकणार नाही..!!


थोडा वेळ थांबेल कदाचित, पण-

माघार स्विकारणारी, मी नक्कीच  नाही..!!



Sunday 20 April 2014

काही मुक्तछंद

शब्द असते तर,
अर्थ तरी लावला असता,
पण-
शब्दच नाही..!!
मग प्रश्न पडतो-शांततेचा..??

शांत माझा मग संयमी गोंधळ..!!
***
ओल्या धुक्यात चिंब व्हावं
तसं काहीसं होतं..!!
जेव्हा तू माझा आहेस,
हे स्पष्ट होत-
तुझ्या डोळ्यातून..
तसच शब्दानीही एकदा बोल..!!
***
तू आला नाहीस,
कदाचित-
येणार पण नाही..
पण,
तुझी आठवण
केव्हाचीच आलीय,
सकाळच्या पहिल्या-किरणासोबत..!
***
मी स्वत:च ठरवलंय,
स्वप्नातून सत्यात येताना,
फक्त-
नावा पुरतेच,
तुझ्यात उरायचे...!!
***
खूप मोठा
फरक आहे..!!
तू आणि मी चा..!!
***

चार ओळी [३]

म्हटलं जरा
शांत बसावं-
आपल्यात आपण
मुकं हसावं..!!

जमलंही काही
चुकलही काही
गोंधळात गप्प

दिसलही नाही..!!
***
भयंकर शांतता
पसरली वाटते तिथे..
कागदाचे फडफडणे ही
व्यतीत करतय इथे..!!
***
तू हवा होतास मला!
आकंठ तृप्तीने न्हाहून,
पवित्र होण्यासाठी..!!
आणि पूर्णत्वाने,
तुझी होण्यासाठी..!!
***
“कशी आहे..??”
अशीच आहे..!!
“माहिती आहे..!!”
***
निघून गेलास.. हरकत नाही...
फक्त-
भास ठेवून का गेलास..??
प्रश्न आहे.. तक्रार नाही..
***

Monday 14 April 2014

कशे सुचले हे माझे शब्द..??

रात्रभर जागले माझे शब्द..!!
आतुरतेने दाटले माझे शब्द..!!

निखळ त्या हसण्यात तुझ्या 
बरसून गेले माझे शब्द..!!

उगाच मला का अशे वाटले,
तुलाच गीरवतात माझे शब्द..!!

अर्थ तू चुकीचा काढलास,
आणि दोषी ठरले माझे शब्द..!!

हिणवून तू फक्त नजरेने,
बदनाम केले माझे शब्द..!!

तू भेटलास अचानक इथे,
आणि लपले  माझे शब्द..!!

तुझ्या सारखाच मलाही प्रश्न,
कशे सुचले हे माझे शब्द..??


Friday 11 April 2014

चार ओळी [२]

एक तारा माझ्यासाठी तुटला
मनाचा बंध फुटला..
नाही म्हणतानाही

तुझ्यावर सये जीव जडला..
***

खिडकीच्या काचे वरचे
फुलपाखरू जरा वाटते रुसले..!!
बरेच दिवस झालेत –
ते नाही माझ्याशी बोलले...!!
***

रुसलेली कविता
अन तुही..
कासावीस शब्द
अन मीही..
***

मला शब्दाचे थेंब दिसतात
धो-धो पडणाऱ्या पावसात...!!
आणि तुम्हाला दिसते कविता
ओलीचिंब भिजलेली रानात..!!
***

वेडा करतोय हा पाऊस मला
प्रत्येक थेंबा सरशी..!!
आधीच त्याची दिवाणी,
आता पूर्ण स्वत:चाच करतोय मला..!! – वेडा पाऊस.. 

Saturday 5 April 2014

चार ओळी [१]


आज चक्क त्यानी मला
चंद्र पाहायला सांगितला..!!
त्याला आवडत नाही म्हणुनच
मी चंद्राचा नाद होता सोडला..!!
*****

आज माझ्या खिडकी जवळ
एक फुलपाखरू आले..!!
गालावर ओघळलेले अश्रू
टिपून उडून गेले..!!
*****

मला तू
माझाच वाटतो..!!
पण पडक्या भिंतीवरचा “पारवा”
तसं काही नाही म्हणतो..!!
*****

काळवंडलेला चेहरा आरशात पहाताना
मलाच माझी कीव आली..!!
डोळ्यातलं पाणी पुसूनही
विचारांची विहीर नाही आटली..!!
*****

कविता हसली,
असे मी समजली..!!
खर सांगू,
इथेच मी चुकली..!!
*****