Wednesday 26 February 2014

नकोच वाचावे “ज्या”ने वाटे

त्याचे व्हावेसे वाटे मजला 
ज्याला हे न कधीच कळे..!!
केलाच नाही विचार ज्याचा
तोप्रत्येक वेळी हसून टाळे..!!

त्याच्या आठवणीत भिजले सदा
ज्याला काहीही फिकीर नाही..!!
स्मरले मला ज्याने सदा
तोमला रुजला नाही..!! 

त्याने कधी वाचल्याच नाही
ज्याच्यासाठी लिहिल्या ओळी..!! 
नकोच वाचावे ज्याने वाटे
तोसमजून वाचे प्रत्येक वेळी..!! 

त्यात हरवले माझे शब्द,
ज्याला वाटे मी खुळी.!!
खंत वाटते फक्त ज्याची 
तोन करी तक्रार मुळी..!!

Monday 24 February 2014

थांब जराशी


जुळलेच जे नाही नाते,ते मी तुटले म्हणाले.. 
सर्व कधीच संपले होते हे निघताना मज कळाले..!!

मागे काही बाकी नव्हते,तरीही पाय घोटाळले,
मी निघताना म्हणे तुझे अश्रू होते वितळले..!!

माझ्या चुकांचा हिशोब, मी मागणारच होते,
पण गैरसमज तू सर्व, होते तेव्हा निवळले..!! 

विसरून सर्व आता,पुढे चालायचे होते ठरवले,
पण मी निघताना होते तू "थांब जराशी" म्हटले..!!

म्हणून या वळणावर, रस्ते असावे संपले,
शब्दाखातर तुझ्या, मी थोडे वळून बघितले..!! 


Friday 21 February 2014

१७,१८,१९,२०




कविता लिहित असताना असे कळले  काही
माझ्यात निरागसपणा काहीच उरला नाही


आरडा ओरडा  करत खेळत असलेले त्या लहान मुलांकडे लक्ष गेलं
आणि
एरवी प्रमाणे डोक्यात सैरा वैरा धावणाऱ्या विचारांना बाजूला
करण्याचा बहाणा मिळाला,
(तसं एवढं सोपं  नसतं  ते, पण असो )
कॉलनी मधली मुलं क्रिकेट खेळत होती.


बॅटिंग करत असलेल्या मुलाने चौकार मारला
आणि तिथे असलेल्या सर्व मित्रांना
(कदाचित जवळच  खेळत असलेल्या त्याचा मैत्रिणीला सुद्धा )
ऐकू जाईल अश्या आवाजात बोलला,

“१६ रन होते १७, १८, १९, २० झाले रे..”


कदाचित वरती सैरा वैरा धावणारे विचार खऱ्याने आता बाजूला झाल्या सारखे वाटले.
(पण हा आनंद जास्त काळ टिकणारा नव्हता )
एक प्रश्न डोक्यात आला,
हा निरागसपणा आपल्यातून विरघळून गेला आहे का.?


माझ्या किंवा तुमच्या मनात १६ अधिक ४, २० होतात असं  फटकन उत्तर येतं,
मधली  मोजणी करायला, आपण कधीच मोठे झालो आहोत.
अर्थात काहींना याचा गर्व सुद्धा असेल.
माझ्या मोठेपणाचा प्रवास
शिकवणी मधले मास्तर,वाढता वर्ग, सुधारित  अभ्यासक्रम ,calculator,संगणक असा जास्त झाला .
यांनी माझ्यातला निरागसपणा एखादा vacuum cleaner कचरा ओढून घेतो तसा संपवून टाकला.

मोजण्याची सवय लावली आहे या  दुनियेने.
गुण, टक्के, पैसे, वजन,
या गोष्टींमध्ये एक एक पाऊल चालण्यात अर्थच राहिला नाही.
उंच उडी, झेप ,झोका , भरारी
आणि ना जाने कितीतरी फालतू शब्द प्रेरणा देतात म्हणे हे सगळं मिळवण्यासाठी


(सोडा हे सगळा, कुणालाच न सुटलेलं कोडं मी एका कवितेत  कुठनं सोडवणार आहे)
असा विचार करत असताना त्या मुलां कडे माझं  पुन्हा लक्ष गेलं  


आणि पुन्हा त्याच मुलाने त्याच्या मित्राला विचारले "किती वाजले रे ?"
घड्याळ बघत तो हळूच म्हणाला “लहान काटा ७ वर अन मोठा बारा वर” आणि आवेगाने बोल ला “७ वाजले, अजून थोडा वेळ खेळू शकतो”
मी माझी घड्याळ बघितली आणि माझ्याच मनातला आवाज मलाच चिडवत म्हणाला


कविता लिहित असताना असे कळले  काही,
माझी घड्याळ तर धावायला सांगते , वेळ सांगत नाही


सौजन्य:
-वैभव गुणवंत भोयर
vgb3333@gmail.com


Tuesday 18 February 2014

अन माझी मी, ओळख हरवून आली..!!

रस्ता चालताना,बरीच दूर निघून आली..!! 
अन माझी मी, ओळख हरवून आली..!!

दर्द भरी कहाणी, आज ऐकवणार नाही,
शेवट त्या व्यथेचा, मी करून आली..!!

तुटलेल्या क्षणानाही, एक खंत वाटावी, 
ती सवय, आठवणी जपायची तोडून आली..!!

जगण्याचे म्हणे, उत्तरे सापडत नाही,
म्हणून हरेक प्रश्नच मी, संपवून आली..!!

काय झाले..?? काय बघता डोळे विस्फारुनी..??
का मी तुमच्या अपेक्षांच्या पुढे निघून आली..??

रडत,कोसळत,ओरडत असंच जगावं का मी..??
दुख: हृदय तुटण्याचे, मी पेलवून आली..!! 

अग्निपरीक्षेत स्वत:च्या यशस्वी होऊन,
अस्तित्वात मी आज नव्याने आली..!!


Thursday 13 February 2014

प्रेमा रे



वेगळे दोघांचे राहणे अशक्य अता 
नको देऊ हा- विरह प्रेमा रे..!!

ना दिसावी चाहूलही भेटायची 
इतका तू का- निष्ठुर प्रेमा रे..!!

आघात-अपघात फार दिलेत
तरीही तुझा का- मोह प्रेमा रे..!!

येण्याची अन जाण्याची लगेच
सांग तुला का- घाई प्रेमा रे..!!

निरपेक्ष कुणावर प्रीत करावी 
हाच काय माझा- दोष प्रेमा रे.!!


Wednesday 5 February 2014

अपराध

"अपराध"

मस्करीत नको ते शब्द बोलले गेले;
आणि टचकन डोळ्यात तुझ्या पाणी आले..!!

घात करायचा नव्हताच, पण नको ते घडले;
आणि अपघाताचे या घावही भलतेच खोल झाले..!!

असह्य तुझ्या डोळ्यातील तिरस्काराने केले;
आणि तू नजरेतून सहज सर्व टाळले..!!

शब्दांच्या वेदनांना बऱ्याचदा मी उपाय शोधले;
शेवटी खंत उराशी कवटाळून हे जगणे स्वीकारले..!!

पण मी खरच मुद्दाम नाही काहीच केले;
"अपराध" जे तुला वाटतात, ते नकळत घडले..!!