Tuesday 21 January 2014

निखारे

सुरवात कशी करू आणि संपवू कुठे..!!
बाका प्रसंग उद्भवला अता जाऊ कुठे..??

कळत नाही, कळतय काही, असही नाही,
फक्त नकळत कळतच सार, सांगू कुठे..??

जगण्याची दिशा हरवली नव्हतीच मुळी
पण ओळखीचाच हा रस्ता नेतोय कुठे..??

रक्तबंबाळ भावनेचा कागद दुर फेकला खरा
पण शब्दांच्या जखमेचे ओरखडे लपवू कुठे..??

खंत तरळलेल्या आसवांची नव्हतीच कधी
पण कळे ना उसने हे अवसान हसण्याचे कमाविले कुठे..!!

जुने चटके रंगवून सांगण्यात कसली मजा..??
नवीन “निखारे” शोधण्यासाठी अता जाऊ कुठे..??  

(२१/०१/२०१४, यवतमाळ)



Thursday 9 January 2014

"तो" म्हणजे

लोकांची तक्रार असते नेहमी, 
कवितेत का “तो” असतो नेहमी..??
मलाही नकोच असतो कवितेतला “तो”
पण शब्द तिथेच सापडतात नेहमी..!!


लोक म्हणाले, “कंटाळलोत आम्ही,
त्याच्या विषयीच तू बोलतेस नेहमी..!!”
“तोच” नाही का माझी अलिखित गझल
जी लिहायचा फक्त प्रयत्न करते मी..!!


धमकी देत म्हणाले, “शेवटचे बजावतोय,
“तो” दिसला जरी पुढे वाचणारच नाही आम्ही..!!”
तुमची पर्वा केलीच कधी श्रोतेहो 
“तोच” पुज्य, मला आणि कवितेलाही नेहमी..!!


पुढे म्हणाले, “विसरलीस वाटतेस,
आम्हीच  तुझ्या शायरी ची वाहवा केलीय नेहमी..??”
माझी प्रत्येक शायरी सुंदर सजली
फक्त त्याच्याच साठी नेहमी...!! 


शेवटी वैतागून म्हणाले, “का त्याच्या नावाने,
लपतेस दुख: अंतरातले नेहमी.??”
“तो” म्हणजे फक्त दुख: आणि वेदना
हेच विसरलात वाटातय तुम्ही..!!

Friday 3 January 2014

रात्री नंतर प्रकाशाचा सूर्य आहे सांडला


तू अधीर, मी अधीर, चंद्रही अधीरला
सूर्याने सांजवेळी खेळ आंधळा मांडला

दु:ख आपले थैमान मांडून अंतरी बैसला
शांततेने या जीव फार उदासला

समुद्राच्या गाभाऱ्यात सूर्य पहा बुडाला
गावाबाहेरील देवळात अन मी दिवा लावला

निशेच्या एकांतात छळतो तुझा अबोला
कितीदा सांग गुंफू आसवांची शृंखला?

गुलाबी थंडीत मी जपते जुलमी दुरावा
प्रतीक्षा तुझी संपेल नक्की हीच आस जीवाला

संपणार कधी ही व्यथेची मालिका..?
हे सख्या सांग ना रे हे आता तू मला..!

फिरून फिरून जन्म जरी दु:खाने घेतला
रात्री नंतर प्रकाशाचा सूर्य आहे सांडला..!!