Thursday 14 February 2013

सांजवेळी


आजच्या सांजवेळी,तुझी आठवण आली..!!
मनातील कल्लोळाला लेखानीनीही साथ दिली..!!

"एका मुर्तीकारासारख-
'दगडावर' प्रेम करून ,
अप्रतिम मूर्ती घडवली होतीस तू..!!"
पण तीला तसच,
एकट-अनोळखी रस्त्यावर सोडून;
कुठे रे निघून  गेलास..??
तुझ्या परतीची वाट पाहून;
डोळे का थकत नसावे बऱ..!!

 आजच्या या कातरवेळी,
तुला आठवताना;
ती बोगनवेल आठवते..!!
तिच्या जवळ उभं राहून 
पहिल्यांदा-
तू माझे अश्रू पुसले होते..!!
आणि मनापासून हसवलं होतं..!!
खरं सांगू 
आताही ती वेल,मला छळते-मला हसते..!!
पण तू नसताना,
तीच मला हसवते..!!

 आजच्या या संध्याकाळी,
तुला आठवताना ..
ती शेतातील विहीर आठवते..!!
तिच्याच काठावर बसून;
'व्यवहार' ज्ञान दिल होतस...!!
माझ्या नकळत-
तिथेच,स्वत: च लढायला;
शिकवलं होतस..!!
आताही कधी खचल्यवर 
तो विहिरीचा काठ,
मी नेहमीच जवळ करते..!!

 आजच्या या अवसेसमयी 
तुला आठवताना..
ती मेहंदीची रांग आठवते..!!
जिथे तू-
स्वप्न पाहायला शिकवलं..!!
स्वप्नात रंग दिले..!!
आता जेव्हा स्वप्न संपले,
असं वाटते..!!
तेव्हा तीच मेहंदीची रांग,
डोळ्यात स्वप्नांचे रंग देते!

 आजच्या या सांजवेळी,
तुला आठवताना-
तो पहाटेचा उगवता सुर्य आठवतो..!!
तो क्षितीज-
किती विचारांना वाट देऊन गेला..!!
आणि एक रमणीय सूर्यास्त..!!
तेव्हाचा तो क्षितीज,
भावनांची रात्र देऊन गेला..!!

तुला आठवताना-

ते निळ आकाश ..!!
तो तळपता सुर्य..!!
ती रात्र..!!
तो चंद्र..!!
कधी तुझं प्रेम,
कधी तुझा राग,
कधी तुझी इर्षा,
कधी तुझा हर्ष..!!
सर्वच स्पष्ट आठवते..!!

पण..!!
   मुर्तीकरासाराखच..!!
ती बोगनवेल सुकली,
ती विहीर तुटली,
ती मेहंदी कोमेजली,
तो सूर्य विझला,
ते क्षितीज दुरावलं,
ती रात्र संपली,
तो चंद्र रुसला..!!

आताच्या संध्याकाळी,
 त्या आठवणी आहेत..!!

ती मंदिरातली घंटा पण आहे..!!
पण-
तेवढी मंदिरातील मूर्तीच उध्वस्त झाली..!!

माहिती आहे..??
आत्ता तीन-
कितीही सावरायचं ठरवलं न तरीही..
ते "अंगण" आणि 
तो "अंगणातील मोगरा" तिला छळतो म्हणे..!!


No comments:

Post a Comment