Saturday, 12 January 2013

शक्य नाही..!!



आता चालणेही  मला शक्य नाही,

वस्तीत या थांबणेही शक्य नाही..!!


झाकले भाव मनीचे सारे,

जखमांना परंतू झाकणे शक्य नाही..!!


हव्याहव्याशा असल्या सर्व आठवणी,

तरी स्मृतीं सोबत जगणे शक्य नाही..!!


स्वप्नात जरी रमले  फार,

कळले आहे सत्यात तसे शक्य नाही..!!


"नाही" "नाही" तच  जगणे  बांधले,

पण  "नाही" त आता थांबणे शक्य नाही..!! 

No comments:

Post a Comment