Sunday 21 April 2013

पाप


केसात गुंतलेला हात
मानेवरून कधी सरकला..??

काळालाच माहिती...!!

पण तो  स्पर्श 
आजही-
काटा उभा करतो..!!

मनात चुकचूकीची
भावना जागवतो..!!

हवहवस वाटणार
"पाप"
घडता-घडता चुकल..!

त्या नंतर-
      थबकलो...
      थांबलो...
      वळलो...
      परत निघालो..

न केलेल्या  चुकीची
भीती आणि शिक्षा
दोन्हीही उराशी कवटाळून..!!

एकमेकांच्या आयुष्यातून
हरवण्यासाठी..!!

No comments:

Post a Comment