Thursday 25 April 2013

पण नंतर मात्र मला दोष नको…!!


जे म्हणालास तेच केलं.. !!
सर्व उद्रेक आणि राग उकळता मनात ठेवूनही;
चेहरा शांत आणि शांतच होता…!!

आता बळी देणाऱ्या शेळी सारखा-
साज-धाज नाहीच जमणार..!!

तुमची दिखाव्याची पावले तिथेच रोखा,
नाही तर वर्षानुवर्षे जपत आलेला उंबरठा- एका क्षणात तोडेल…!

इशारा - धमकी
जे हवं ते समजा,

उद्धट - रग्गेल
जे हवं ते बोला,

पण नंतर मात्र  मला दोष नको…!!

No comments:

Post a Comment