Friday 3 January 2014

रात्री नंतर प्रकाशाचा सूर्य आहे सांडला


तू अधीर, मी अधीर, चंद्रही अधीरला
सूर्याने सांजवेळी खेळ आंधळा मांडला

दु:ख आपले थैमान मांडून अंतरी बैसला
शांततेने या जीव फार उदासला

समुद्राच्या गाभाऱ्यात सूर्य पहा बुडाला
गावाबाहेरील देवळात अन मी दिवा लावला

निशेच्या एकांतात छळतो तुझा अबोला
कितीदा सांग गुंफू आसवांची शृंखला?

गुलाबी थंडीत मी जपते जुलमी दुरावा
प्रतीक्षा तुझी संपेल नक्की हीच आस जीवाला

संपणार कधी ही व्यथेची मालिका..?
हे सख्या सांग ना रे हे आता तू मला..!

फिरून फिरून जन्म जरी दु:खाने घेतला
रात्री नंतर प्रकाशाचा सूर्य आहे सांडला..!!

No comments:

Post a Comment