Wednesday 7 May 2014

एकदा त्याने आरशाला विचारले

एकदा त्याने आरशाला विचारले,
“कसा दिसतोय..??"
त्याने स्वत:च्या डोळ्यात खोलवर पहिले,
थोडा भ्यायालाच, कारण-
त्याला दिसली नाही आपल्या,
डोळ्यात पूर्वी सारखी चमक..
आणि-
नव्हती त्याचा आवाजात, नेहमीची धमक..

पुन्हा एकदा, त्याने आरशासमोर डोळे विस्फारले..!!
म्हणाला, “काय बघतोय..??"
आणि डोळ्यात त्याला दिसले-
करत असलेले आपणच परिवाराचे हाल,
आणि गमावलेले स्वत:चे गाल..!!
त्याला आठवत होता त्याचा हरवलेला काल..!!
पण तेवढ्यातच चुकचुकली भिंतीवरची पाल..!!

पुन्हा एकदा,
त्याने आरशामध्ये डोकावले..!!
आता त्याने काय बर पहिले..??
भिंतीवरील हसत होते जाळ,
कानाजवळ वाजत होते टाळ,
जणू जवळ येत होता त्याचा काळ..!!

पण अचानक,
पुन्हा एकदा, त्याने आरशात पहिले..
तेव्हा हसत होता त्याच्या समोरचा आरसा,
त्याला चिडवत होता त्याचा तो आसरा..!!
 हातात असलेल्या दारूच्या बाटलीने,
आपल्या दारिद्र्याच्या कारणाने,


त्याने केले आरशाचे तुकडे तुकडे..!!
नशिबही तसेच फुटके फुटके..!!
आता तर,
हसत होते आरशाचे शंभर तुकडे,
रडत होते नशीब बिचारे फुटके,

आणि जवळच,
मिसळत होते-
डोळ्याचे पाणी, दारूच्या प्रवाहात..!! 




[२००९]

1 comment:

  1. ' भिंतीवरील हसत होते जाळ ', या ओळीत तुम्हाला काय म्हणायचं ते कळलं नाही. कवितेची सुरवात खूप छान होऊन शेवट मात्र म्हणावा तसा साधला नाही. स्पष्ट प्रतिक्रियेबद्दल क्षमा असावी. पण एकूण तुमचा ब्लॉग छान आहे.

    ReplyDelete