Sunday 16 March 2014

चूक नाही त्यात हेच मी समजत गेली..!!

प्राण कंठाशी आणून प्रतीक्षा केली गेली
चूक नाही त्यात हेच मी समजत गेली..!!

माझे अगदीच निरागसतेने आपले मानणे  
खटकतय तुला हेच उशिराने मी उमजली..!!
चूक नाही त्यात हेच मी समजत गेली..!!

वाढतात हृदयाचे ठोके तुझ्या नावाने 
पण ही तर सवय नेहमीची झाली..!!
चूक नाही त्यात हेच मी समजत गेली..!!

भेटायचे ठरले जरी, सजायची उत्साहाने
तसही तेव्हा स्वभावाची वेगळी बाजू उमगली..!!
चूक नाही त्यात हेच मी समजत गेली..!!

नाहीच मुळात आवडले मैत्रिणीचे उचकावने
समजेना,तिला का शंकेची इंगळी डसली..!!
चूक नाही त्यात हेच मी समजत गेली..!!

आपल्या दोघात निखळ मैत्री जपली आग्रहाने
लोकांनी तिथेही किती प्रश्ने विचारली..!!
चूक नाही त्यात हेच मी समजत गेली..!!

“आता लगेच येतो” म्हणत तुझे निघून जाणे
जगाला तू भ्यायल्यायची चाहूल मला लागली..!  
चूक नाही त्यात हेच मी समजत गेली..!!

परतणार नाहीस हा विश्वास खोटा ठरणे
पुन्हा नव्याने प्रेमा व्यतिरिक्त नाती जुंपली..!!
चूक नाही त्यात हेच मी समजत गेली..!!

No comments:

Post a Comment