Wednesday 26 March 2014

बाजार

“बघितलस का..?? ती मुलगी, लाल साडीतली, नवरदेवाची चुलत बहिण, ती म्हणत होतो मी, आपल्या चिरंजीवासाठी, आवडली का तुला ती..?? ”, आपल्या श्रीमतीला लग्नाच्या भरगर्दीत ती लाल साडीतली मुलगी दाखवायची धडपड श्रीमान करत होते.
“नाही हो..!! तीच नाक पहा कस आहे..!! तिच्यापेक्षा ती निळ्या सलवार मधली बघा कशी सुंदर आहे. अगदी नाकी-डोळी नीटस..!! ”, श्रीमानानी सांगितलेली मुलगी नकारत श्रीमती ला दुसरीच कुणी आवडते..
दोघेही आपल्या चिरंजीवाला, “बघ, ह्या लग्नात तरी एक मुलगी पसंत कर..!! आम्ही काही पाहून ठेवल्यात, ती लाल साडी आणि नीळा सलवार, नवरदेवाच्या मागे उभ्या आहे त्या. किंवा तिकडे कोपऱ्यात पण छान आहेत काही मुली, सांग कुठली आवडते का ते, म्हणजे बोलणी पुढे नेऊ..!!

जवळपास मी attend केलेल्या सर्व लग्नात कुठे ना कुठे अश्या किंवा अश्या आशयाचे बरेच संभाषण ऐकण्यात आली. त्यातले काही ऐकून तर अंगावर काटा उभा राहिलेला आजही आठवतो. मुलीला तिच्या नावावरून ओळखण्या पेक्षा तिच्या appearance वरून तिची ओळख केली गेली..! ही नाही तर ती, ती नाही तर दुसरी ती, अश्या choices ठेवून किती तरी आईंना त्यांच्या चिरंजीवाशी बोलताना मी ऐकलंय..!! 
आणि हे लाडके चिरंजीव काही अनपड किंवा नासमज नसतात, चांगले शिकलेले पदवीधर असतात..!! त्यानाही मी ‘नाही ती नको ती इतरते आहे.’, ‘नको तिचे केस काळे नाहीत’, ‘ती थोडी जाड आहे’, ‘ती भलतीच बारीक आहे.’ ‘तिचा रंग सावळा आहे.’, ‘ती फारच खेडूत आहे.’ अशा आणि अनेक कारणांवरून मुलींची खिल्ली उडवून त्यांना नकारताना पहिले आहे. आजची तरुण पिढी अशी दिसण्यावरून मुलगी पसंत करते, हे सत्य कुठेतरी खटकते नाही का..?? पण हे खूप मोठं सत्य आहे आजही, काही ठिकाणी मुलींचा बाजार मांडल्यागत मुली दाखवल्या जातात किंवा स्वत: साठी पसंत तरी केल्या जातात..

काही मुलं तर सरसकट त्या मुलीच्या तोंडावर सांगतात, मला stylish बायको हवी आहे तू फार साधी दिसते किंवा मला गोरीच हवी, तू सावळी आहे किंवा तू अमुकतमुक शहरात शिकायला होती,तिथे म्हणे प्रत्येकाचे काही ना सुरूच असते..!! मुलगी पहायला चाललोत दुकानातून बाहुली विकत आणायला नाही, हे प्रत्येक मुलांनी लक्षात ठेवावे. नाही का..?

ह्या सर्व रूढीना मुलीनी विरोध करू द्या, तिच्या बद्दल च्या अफवा क्षणात वातावरण गंभीर करतात. तिचं बाहेर काही तरी सुरु आहे पासून तिची कीर्ती सुरु होते ते आईचे संस्कारच अशे पर्यंत गरज नसताना विषय ताणला जातो.

माझा लग्न,रूढी,परंपरा ह्या गोष्टीना विरोध नाही, फक्त एखादी मुलगी पहायला जाताना किंवा बघताना तिचा आदर करायला शिका..!! नाही ना आवडली तुम्हाला ती, शांततेने, आदराने नकार कळवा..!! तिचा अपमान करायचा, तिच्या चारित्र्यावर शंका घ्यायचा हक्क तुम्हाला कुणीही दिलेला नाही..!! बाजारातील बाहुली पाहतोय हा समज ठेवून स्वत:ची अर्धांगिनी शोधली जाते, म्हणूनच कदाचित घटस्फोट वाढत असलेले दिसतात..!!

ही मुलगी बघण्याची प्रथा एकाऐकी थांबवता येणार नाही, पण जर तुम्ही स्वत:साठी सहचारिणी शोधत असाल तर कमीत कमी एक माणूस म्हणून माणसाचा शोध घ्या..!!   


  

No comments:

Post a Comment