Saturday 8 March 2014

मत दे यार..!!

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यात, प्रत्येक न्यूज channel वर चर्चेच्या नावाखाली चाललेली वाद माझ्यासारख्या पहिल्यांदाच स्वत:चे मत देणाऱ्या तरुणांसाठी किती उपयोगाचे ठरते हे विचार करण्या सारखे..! कुठलं सरकार निवडून द्यायचे यासाठी प्रत्येकाचं मत महत्वाचे  असते,अशात ह्या चर्चा (वाद-विवाद) आम्हाला जास्त संशयात टाकतात..!

आपलं मत कुणाला द्यायचं हे ठरवताना आधीच बोचाकळ्यात पडलेल्या तरुणांना अधिकच बोचाकळ्यात पडतात ती घोषनापत्रे आणि भाषणे..!!

आणि आश्चर्य वाटू नये,पण काही घोषणा पत्रातील तरतुदी मला हसू कि रडू या मन:स्थितीत टाकतात.

स्त्रियांच्या सुरक्षतेताच मुद्दा जो खर तर या वर्षात झालेल्या बलात्कारा मुळे उघडकीस आला. किती घोषणापत्रात याचा उल्लेख तरी केला  आहे..?? काहीच मोजक्या पक्षांनी या मुद्द्याला प्राधान्य दिले आहे.ज्या पक्षांना स्त्रियांचे महत्व, त्यांची सुरक्षितता,त्यांचा आदर वैगेरे गोष्टी समजतच नाही (ज्यांनी उल्लेख केला त्यांना समजतेच असे नाही,पण कमीत कमी त्यांनी हा मुद्दा गरजेचा आहे हे जाणले हे तरी प्रशंसनीय आहे) त्या पक्षाला मत देताना मीही जरा विचारच करेल, इतक्या गंभीर विषयाकडे कुणी दुर्लक्ष कसे करू शकते..!!


भारतात बेरोजगाराचे प्रमाण वाढते आहे (सध्या मीही एक बेरोजगार आहे). अश्यात बेरोजगारांची क्षमता,कौशल्य वाढवून त्यांना रोजगाराची ग्वाही देणाऱ्या पक्षाकडे कौल जाणे योग्य आहे पण ही आता स्वयंरोजगाराची दिली जाणारी वचने वचनेच राहिली तर..? हा प्रश्न जास्त भेडसावतो..!! त्यात भर म्हणून एका घोषणापत्रात तर चक्क असे वाचायला मिळाले कि, पदव्युत्तर बेरोजगार व्यक्तीला ३०००/- रुपये बेरोजगारी भत्ता दिला जाईल, म्हणजे आधीच व्यक्ती बेरोजगार त्यात घरी बसल्या-बसल्या भत्ता मिळतो म्हणजे आता आळशीही व्हायला मुक्त..!!

आणि काय तर म्हणे भारत कृषिप्रधान देश आहे..!! काय आहे या देशात शेतकऱ्यांची स्थिती...?? देशाला अन्नपुरवठा दाताच धड दोन वेळचे पोट भरून जेवू शकत नाही. वाढत्या महागाईत शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा म्हणून त्यानाच धोरणे करावी लागतात यापेक्षा कृषिप्रधान भारताची शोकांतिका कुठली असू शकते..??

अशी एक ना अनेक मुद्दे, जे फक्त घोषणा पत्रात आणि दिलेल्या भाषणात वापरली जात असली तरी ती कित्ती प्रमाणात आचारली जातात हा प्रश्न तो प्रश्नच उरतो..!!

या वेळी पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाचे योगदान देणाऱ्या माझ्या सारख्या तरुणांना माझी विनंती आहे, थोडे कान-डोळे उघडे ठेवून मतदान द्या,सुट्टी आहे म्हणून दिवस मज्जेत घालवण्यापेक्षा मतदानात सहभागी व्हा..!! तुमचे मुद्दे आपले समजून मांडणाऱ्या, तुमच्या सुरक्षितता,उदरनिर्वाह अधिक सोयीस्कर करणाऱ्या उमेदवार,राजकीय पक्ष ओळखून मतदान करा..!!

स्त्री-सुरक्षा,बेरोजगारी,नैसर्गिक आपत्ती,वाढती महागाई,आपसी मतभेद अश्या सर्वच समस्यांवर मात करून तरुणांनीच भारताचा प्रगत देश बनविण्याचा विडा उचलायचा आहे आणि चला त्याची सुरवात आपले अमूल्य मतदान योग्य पक्ष/नेत्याला देऊन करूया..!!
  


No comments:

Post a Comment