वाढत्या वयामुळे
पांढरे झालेले केस
स्वतःच्या हातानी सावरत,
पैशानी उन्मत झालेला
पुरुष म्हणाला-
"स्ञीनी स्वतःभोवती
एक वर्तुळ आखावं...!
आणि त्यातच आपले
जीवन संपवावं...!
उगाचच,
...
पांढरे झालेले केस
स्वतःच्या हातानी सावरत,
पैशानी उन्मत झालेला
पुरुष म्हणाला-
"स्ञीनी स्वतःभोवती
एक वर्तुळ आखावं...!
आणि त्यातच आपले
जीवन संपवावं...!
उगाचच,
...
परिघाबाहेर डोकावण्याचे
धाडस करु नकोस,
वर्तुळाचा मध्यबिंदूही
मग-
गमवावा लागेल.."
स्ञी-
एक स्ञी म्हणून..!
का परीघात बांधून राहू..?
का पुरुष शरणता स्विकारु..?
हे पुरुषा,
स्ञीत्वाची अवहेलना
करु नकोस.!
कितीही बंदिस्त केलसं ना
तरिहि-
मर्दिनीच रुप घेऊन,
सर्व पाश तोडून,
तुझा हा पुरुषी अहंकार-
पायाखाली तुडवण्यासाठी
मी क्षणाचाही
विलंब करणार नाही..!
बेगुमानपणे-
स्ञीवर शिंतोडे उडवणारी
तुझी जीभ आत्ताच आवर,
नाहीतर-
तोंडावाटे ब्र काढायची
सोय उरणार नाही..!
परीघ काय..?
आणि-
मध्यबिंदू काय..?
स्ञीवर मर्यादा टाकून,
तिची कुचंबणा करण्याचा
मुर्खपणा करु नकोस..!
आज-
लक्ष्मी अंगणात खेळत आहे,
म्हणून माज बरा नाही..!
उद्या-
ती निघून गेल्यावर,
क्षणार्धात भिकारी होशील..!
याद राख...!!
धाडस करु नकोस,
वर्तुळाचा मध्यबिंदूही
मग-
गमवावा लागेल.."
स्ञी-
एक स्ञी म्हणून..!
का परीघात बांधून राहू..?
का पुरुष शरणता स्विकारु..?
हे पुरुषा,
स्ञीत्वाची अवहेलना
करु नकोस.!
कितीही बंदिस्त केलसं ना
तरिहि-
मर्दिनीच रुप घेऊन,
सर्व पाश तोडून,
तुझा हा पुरुषी अहंकार-
पायाखाली तुडवण्यासाठी
मी क्षणाचाही
विलंब करणार नाही..!
बेगुमानपणे-
स्ञीवर शिंतोडे उडवणारी
तुझी जीभ आत्ताच आवर,
नाहीतर-
तोंडावाटे ब्र काढायची
सोय उरणार नाही..!
परीघ काय..?
आणि-
मध्यबिंदू काय..?
स्ञीवर मर्यादा टाकून,
तिची कुचंबणा करण्याचा
मुर्खपणा करु नकोस..!
आज-
लक्ष्मी अंगणात खेळत आहे,
म्हणून माज बरा नाही..!
उद्या-
ती निघून गेल्यावर,
क्षणार्धात भिकारी होशील..!
याद राख...!!
No comments:
Post a Comment