Wednesday, 6 March 2013

जखमी वाघीण

काळाच्या प्रत्येक आघातावर;
सडेतोड उत्तर देताना-

वेदनेच्या वावटळात
घुसळत-घुसळत चाललेली..!! 

त्वेषाच्या ज्वाळेत
जळत-उजळत असलेली..!!

अहंकारी शब्दाच्या 
असंख्य वारांनी दुखावलेली..!!

नियतीचा हरएक डाव 
खिलाडी वृत्तीने खेळणारी..!!

बंधन झुगारून 
स्वप्न पाहायचं धाडस करणारी..!!

आजही जिद्दीने-
नैराश्याची वलये तोडून 
"जिंकणार" "जिंकणार" अशी
चवताळून ओरडणारी "जखमी वाघीण"--मी..!!! 

Saturday, 2 March 2013

"ऋणी" केलस तू..


मी एक चौकोन होती.!
स्वतःच्याच विचारात
बंदिस्त..!
त्या चार रेषांच्या
बाहेर पुन्हा पाय ठेवुन
जगायला शिकवलसं तू..!

स्वतःच्याच पिंजर्‍यात
अडकलेलं पाखरु होती मी!
त्या भावुक पिंजर्‍याच्या
भिंती तोडुन,
पुन्हा
उडणं शिकवलसं तू..!

त्या भूतकाळांच्या बेड्यांमध्ये
बंदिस्त कैदी होती मी..!
त्या मनांच्या जखमेवर
मायेची फुंकर देउन,
पुन्हा मनापासून-
हसणं शिकवलसं तू..!

या स्वार्थी जगात
रंग उडालेलं फुलपाखरु होती मी..!
नवीन अगदी नाजुक
आयुष्याचे रंग देउन,
पुन्हा फुलामागे उडायचे पंख दिले तू..!


स्वतःच्याच स्वप्नात हरवलेली-
एक नासमज पाकळी होती मी..
आज असच दवांसारखं
नकळत येउन,
मला अस्तित्व दिलस तू..!

अधिर होउन जगताना
एक
अस्पष्ट धूर होती मी..!
त्यातही
स्वतःवर विश्वास ठेव सांगुन
धीर दिलास तू..!

स्वतः शब्द होउन,
कवितेत उतरताना..
निर्जिव होती मी..!
त्या कवितेला अर्थ देउन
जिंवत केलस तू..!

मला नविन स्वप्न देउन,
ओठांवर हास्य देउन
डोळ्यात इन्द्रधनुष्याचे रंग देउन,
पुन्हा जुना आत्मविश्वास देउन,
माझ्या कवितांना अर्थ देउन,
"ऋणी" केलस तू..!

बेईमान


विशेष असा फरक 
तसा तर नाही..!!
फ़क़्त-
आता माझी बाजू पडकी नसेल...!!
रात्र नक्कीच-
      तशींच,
खिडकीत संपेल..!!

पण-
तू मात्र नेहमीसारखा 
मायाळू-
दयाळू,
राहणार नाही..!!

इथे माझे शब्द 
आणि 
शब्दाचे अर्थ बदलतील..!!
तुला बेईमान ठरवताना-
संकोच तर सोड..!!
मी जराही कचरणार नाही..!!!

Friday, 22 February 2013

मीच


तू एका हाकेच्या अंतरावर असशील 
तेव्हा 
मीच पाठवळवून रस्ता बदलला असेल 
नकोच रस्त्याचही मिलन 
जर ती मिळणार नसेल..!!

सर्व दूर-दूर
आणि अनोळखीच -छान,
                              समंजस,
                              शांत..!!

तुझा हात पकडण्यासाठी 
माझा एक हात अंतर असेल,
तेव्हा हाताची मुठ वळवून,
मीच निघून गेलेली असेल..!!
नको-नको च्या शब्दानंतर 
हाताचा होकारही नकोच..!!

सर्व दूर-दूर
आणि अनोळखीच -छान,
                              समंजस,
                              शांत..!!

शहाण्यासारखी..!!


असचं  होत -
माझे विचार
आणि 
माझे निर्णय
बदलण्याची ताकद 
आणि हींमत तुझ्यातच आहे..!! 
मला वाटतच असते
मुक्तपक्षासारखं पण -
तुझा "करायला काय हरकत आहे..? "
पूर्नच बदलवत-
तुझा आग्रह कधीच नसतो
किंवा 
हक्क जतावन तर कधीच कधीच  नसत..

म्हणूनच असेल कदाचित 
ऐकते तुझ;
समजते 
आणि 
वागते ही तशीच 
शहाण्यासारखी..!!   

Thursday, 14 February 2013

सांजवेळी


आजच्या सांजवेळी,तुझी आठवण आली..!!
मनातील कल्लोळाला लेखानीनीही साथ दिली..!!

"एका मुर्तीकारासारख-
'दगडावर' प्रेम करून ,
अप्रतिम मूर्ती घडवली होतीस तू..!!"
पण तीला तसच,
एकट-अनोळखी रस्त्यावर सोडून;
कुठे रे निघून  गेलास..??
तुझ्या परतीची वाट पाहून;
डोळे का थकत नसावे बऱ..!!

 आजच्या या कातरवेळी,
तुला आठवताना;
ती बोगनवेल आठवते..!!
तिच्या जवळ उभं राहून 
पहिल्यांदा-
तू माझे अश्रू पुसले होते..!!
आणि मनापासून हसवलं होतं..!!
खरं सांगू 
आताही ती वेल,मला छळते-मला हसते..!!
पण तू नसताना,
तीच मला हसवते..!!

 आजच्या या संध्याकाळी,
तुला आठवताना ..
ती शेतातील विहीर आठवते..!!
तिच्याच काठावर बसून;
'व्यवहार' ज्ञान दिल होतस...!!
माझ्या नकळत-
तिथेच,स्वत: च लढायला;
शिकवलं होतस..!!
आताही कधी खचल्यवर 
तो विहिरीचा काठ,
मी नेहमीच जवळ करते..!!

 आजच्या या अवसेसमयी 
तुला आठवताना..
ती मेहंदीची रांग आठवते..!!
जिथे तू-
स्वप्न पाहायला शिकवलं..!!
स्वप्नात रंग दिले..!!
आता जेव्हा स्वप्न संपले,
असं वाटते..!!
तेव्हा तीच मेहंदीची रांग,
डोळ्यात स्वप्नांचे रंग देते!

 आजच्या या सांजवेळी,
तुला आठवताना-
तो पहाटेचा उगवता सुर्य आठवतो..!!
तो क्षितीज-
किती विचारांना वाट देऊन गेला..!!
आणि एक रमणीय सूर्यास्त..!!
तेव्हाचा तो क्षितीज,
भावनांची रात्र देऊन गेला..!!

तुला आठवताना-

ते निळ आकाश ..!!
तो तळपता सुर्य..!!
ती रात्र..!!
तो चंद्र..!!
कधी तुझं प्रेम,
कधी तुझा राग,
कधी तुझी इर्षा,
कधी तुझा हर्ष..!!
सर्वच स्पष्ट आठवते..!!

पण..!!
   मुर्तीकरासाराखच..!!
ती बोगनवेल सुकली,
ती विहीर तुटली,
ती मेहंदी कोमेजली,
तो सूर्य विझला,
ते क्षितीज दुरावलं,
ती रात्र संपली,
तो चंद्र रुसला..!!

आताच्या संध्याकाळी,
 त्या आठवणी आहेत..!!

ती मंदिरातली घंटा पण आहे..!!
पण-
तेवढी मंदिरातील मूर्तीच उध्वस्त झाली..!!

माहिती आहे..??
आत्ता तीन-
कितीही सावरायचं ठरवलं न तरीही..
ते "अंगण" आणि 
तो "अंगणातील मोगरा" तिला छळतो म्हणे..!!


शिवाय...!!


कधी कधी 
काहीच करायला नसते..!!
समोरच्याची न समजणारी
बडबड ऐकण्याशिवाय..!!
कितीही बोलत असला समोरचा;
तरीही-
स्वत:ला जे हवे ते ऐकण्याशिवाय..!!


कधी कधी
 काहीच करायला नसते..!!
बाजूच्या गोंधळातही
शून्यात हरवण्याशिवाय..!!
खिडकी बाहेर कारखान्याच्या
चिमणीतून निघणारा धूर;
पापणीही न वळवता पाहण्याशिवाय..!!


कधी कधी 
काहीच करायला नसते..!!
गर्दीच्या हो-हो त स्वत:चाही;
 हो मीसळंवत मान हलवण्याशिवाय..!!
डोक्यावरून उडालेल्या विनोदाला;
बत्तीशी दाखवत हसवण्याशिवाय...!!